भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापकांचा गौरव


भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : शहरातील पु.ओं. नाहाटा महाविद्यालयात शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी स्टाफ अकॅडमी आणि स्टाफ अ‍ॅण्ड स्टूडेंट्स वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा गुणगौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, कोषाध्यक्ष संजयकुमाा नाहाटा, प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील गतवर्षात पीएच.डी., नेट-सेट, पेटंट व आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील जर्नल मध्ये प्रकाशित शोधनिबंध प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संचालक मंडळातर्फे शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रा.डॉ.रश्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले.


यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्रास्ताविक स्टाफ अकॅडमी समिती प्रमुख प्रा.डॉ.एस.टी.धूम यांनी तर सूत्रसंचालन पी.ए.अहिरे यांनी केले. आभार प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले यांनी मानले. गुणगौरव यादी वाचन डॉ.मनोज कुमार जाधव, डॉ.ममता पाटील यांनी केले. कार्यालयीन प्रबंधक भगवान तायडे व कार्यालयीन अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ अकॅडमी आणि स्टाफ अ‍ॅण्ड स्टूडेंट वेल्फेअर समितीच्या डॉ.एस.के.राठोड, डॉ.सचिन येवले, डॉ. गौरी पाटील, डॉ.जितेंद्र आडोकार, प्रा.सुनील अडकमोल, डॉ.किरण वारके आदींनी परिश्रम घेतले. प्रसंगी बहुसंख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !