भुसावळातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात दहिहंडी उत्साहात


भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक विद्या मंदिरात आज शनिवार, 5 सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी व गोपाळकाला कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य स्मिता जोशी उपस्थित होत्या.

यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाच्या जीवनावर आधारित विविध गीतांवर नृत्य केले. यानंतर दहीहंडी फोडून गोपाळ काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी तर आभार प्रसन्ना बोरोले यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !