भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवार, 5 सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रिन्सिपल निना कटलर यांच्याहस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नृत्यांनी आणली रंगत
सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले विविध कलागुण सादर केले. शिक्षकांनी सादर केलेल्या विविध नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. सर्व शिक्षकांना व नॉन टिचींग कर्मचार्यांना शाळेच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रिंसिपल निना कटलर यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. व्हा.प्रिन्सिपल श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, कार्यालयीन अधीक्षक सविता सहजे, शिक्षिका सोनाली मुजुमदार, हर्षला पाटील, स्मिता जाधव, एनेट मॅथ्यू यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रिया रायन व श्वेता जोशी यांनी तर आभार प्रिंसिपल निना कटलर यांनी मानले.


