यशस्वी होण्यासाठी ज्ञानाशिवाय पर्याय नाही : भुसावळात प्राचार्य डॉ. रमेश जोशी
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : यशस्वी होण्यासाठी ज्ञाना शिवाय दूसरा अन्य मार्ग नाही. योगी अरविंदानी सांगितलेली त्रिसूत्री नेहमी ध्यानात ठेवावी. त्यात अभिप्सा, त्याग आणि समर्पण या गोष्टी आवश्यक आहेत. विद्यार्थ्याजवळ शिक्षण घेण्याची अभिप्सा अर्थात तीव्र इच्छा शक्ती असली पाहिजे. त्यानंतर या मार्गात येणारे अडथळे दूर करता आले पाहिजे आणि यासाठी पूर्ण समर्पण असलेच पाहिजे याप्रमाणे वागल्यास आदर्श विद्यार्थी, आदर्श मनुष्य सहजपणे होता येते, असे विचार येथे प्राचार्य रमेश जोशी यांनी व्यक्त केले.
हिंदी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात
शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.रमेश जोशी व सर्व शिक्षकांनी सरस्वती मातेचे आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. कौसर व मिसबा कुरेशी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव करीत आपले मनोगत व्यक्त केले.


