भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शिक्षकांचा सन्मान
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात पालक-शिक्षक संघातर्फे विद्यालयातील शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संगणक विभाग प्रमुख व संगणक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आाल. अध्यक्षस्थानी पी.व्ही.पाटील होते.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, पालक-शिक्षक संघांचे उपाध्यक्ष महेंद्र भंगाळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.एस.ए.अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते.

सरस्वती पूजन, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, स्व. बाबासाहेब के. नारखेडे, स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी माल्यार्पण केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.एस.ए.अडकमोल यांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्य तसेच शिक्षकांची महती वर्णन केली. पी.व्ही.पाटील, प्रमोद नेमाडे, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष महेंद्र भंगाळे यांचे स्वागत करण्यात आले.
शुभेच्छा संदेशाचे वाचन उपशिक्षक एस.डी.वासकर यांनी केले. सुयश वाणी व संजीवनी चौधरी यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केले. प्रतिभा पाटील यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. संस्थेचे जॉईट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे व संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन कुणिका बेंडाळे व योगिनी भिरूड तसेच शिक्षकांची यादी वाचन मनिष मावळे व पार्थ चौधरी यांनी केले. आभार प्रगती कांबळेने मानले.

