रेल्वे प्रवाशांना ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : भुसावळ-देवळालीसह ईगतपुरी व बडनेरा मेमू 8 रोजी रद्द
शिरसोली-म्हसावद दरम्यान नॉन-इंटरलॉकिंग कार्य : रेल्वे ब्लॉकमुळे 18 रेल्वे गाड्या उशिराने धावणार
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जलगाव-शिरसोली-म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसवण्यात येणार असल्याने 8 रोजी भुसावळ-देवळाळीसह ईगतपुरी व बडनेरा मेमू मिळून अप-डाऊन मार्गावरील सहा गाड्या रद्द तर 18 रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहेत तर दोन गाड्या निर्धारीत वेळेऐवजी उशिराने धावतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
7 व 8 रोजी ट्रॅफिक ब्लॉक
7 सप्टेंबर 2026 रोजी पूर्व-नॉन-इंटरलॉकिंग काम करण्यात येणार असून 8 सप्टेंबर 2026 रोजी नॉन-इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात येणार आहे. 8 सप्टेंबर 2026 रोजी जळगाव-शिरसोली-म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान 12 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक असेल

8 रोजी या गाड्या रद्द
गाडी क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू, गाडी क्रमांक 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू, गाडी क्रमांक 11113 भुसावळ-देवळाली मेमूख, गाडी क्रमांक 11114 देवळाली-भुसावळ मेमू, गाडी क्रमांक 61129 नाशिक रोड-बडनेरा मेमू तसेच गाडी क्रमांक 61130 बडनेरा-नाशिक रोड मेमू रद्द करण्यात आली आहे.
8 सप्टेंबरला 18 गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक 22590 हडपसर -बनारस अमृत भारत एक्सप्रेस माहेजी स्थानकावर दोन तास 50 मिनिटे तर गाडी क्रमांक 12627 बेंगलोर -नई दिल्ली एक्सप्रेस पाचोरा स्थानकावर एक तास 40 मिनिटे तसेच गाडी क्रमांक 11059 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्सप्रेस गाळण स्थानकावर एक तास 35 मिनिटे थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक 22360 मुंबई-पटना एक्सप्रेस कजगाव स्थानकावर एक तास 15 मिनिटे तर गाडी क्रमांक 17363 हुबळी-योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस वाघळी स्थानकावर एक तास 10 मिनिटे थांबेल. गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस चाळीसगाव स्थानकावर तासभर थांबेल तर गाडी क्रमांक 22511 लोकमान्य टिळक टर्मिनस- कामाख्या एक्सप्रेस हिरापूर स्थानकावर 15 मिनिटे थांबणार आहे. गाडी क्रमांक 11072 बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भादली स्थानकावर दोन तास 45 मिनिटे तसेच गाडी क्रमांक 22589 बनारस-हडपसर अमृत भारत एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर अडीच तास थांबेल. गाडी क्रमांक 11058 अमृतसर-मुंबई एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर एक तास 45 मिनिटे तसेच गाडी क्रमांक 22846 हटिया-पुणे एक्सप्रेस वरणगाव स्थानकावर एक तास 45 मिनिटे थांबेल. गाडी क्रमांक 22537 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दुसखेडा स्थानकावर एक तास 35 मिनिटे तसेच गाडी क्रमांक 11062 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस सावदा स्थानकावर एक तास 15 मिनिटे थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक 11040 गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस बोदवड स्थानकावर एक तास थांबेल तसेच गाडी क्रमांक 11011 मुंबई-धुळे एक्सप्रेस नांदगाव स्थानकावर 20 मिनिटे थांबेल तसेच गाडी क्रमांक 12753 हजुर साहिब नांदेड-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस कजगाव स्थानकावर एक तास 25 मिनिटे थांबेल. गाडी क्रमांक 12715 हजुर साहिब नांदेड-अमृतसर एक्सप्रेस नायडोंगरी स्थानक येथे 40 मिनिटे तसेच गाडी क्रमांक 12103 पुणे-लखनऊ एक्सप्रेस हिसवळ स्थानकावर 20 मिनिटे थांबवण्यात येईल.
दोन गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक 26102 अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस प्रवास 8 रोजी अजनीहून 9.50 ऐवजी 12.50 वाजता सुटेल तर गाडी क्रमांक 19004 भुसावळ-दादर एक्सप्रेस 8 रोजी सायंकाळी 5.40 ऐवजी 6.40 वाजता सुटेल. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे दिलगीर आहे.

