भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात शिक्षक दिवस उत्साहात
भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : शहरातील प.क कोटेचा महिला महाविद्यालयात समारंभ समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.मीना चौधरी होत्या. त्यांनी शिक्षक दिवसाचे महत्त्व आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर उजाळा दिला. प्रा.संदीप नेतनराव यांनी सूत्रसंचालन करीत आभारही मानले.


