यावलच्या सरस्वती विद्यामंदिर शाळेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी यांच्या ‘भाव मनातले’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन


यावल (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : शहरातील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, यावल येथे विद्यालयाचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा संचालक जी.डी.कुलकर्णी यांच्या ’भाव मनातले’ या चौथ्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने उत्साहात पार पडला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व्यास प्रसादिक एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ रमाकांत देशपांडे, अध्यक्ष अरुण कुलकर्णी व प्रणोती देशपांडे यांच्याहस्ते झाले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.सी.ठाकूर, संचालक बी.पी.वैद्य आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रा.एस.एम.जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी जी.डी.कुलकर्णी यांचे ‘गंध वेड्या लहरी’, ‘आकाश अंगणी आणि ‘ऋतुगंध हे तीन काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीस आले असून ‘भाव मनातले’ हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह आहे. एकूण 54 कवितांचा समावेश असलेला हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. यातील कवितांना ग्रामीण शब्दांचा सुंदर साज चढवण्यात आला आहे.


व्यास प्रसादिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार व अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.एस.एम.जोशी यांनी तर आभार संचालक बी.पी.वैद्य यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !