भुसावळातील श्री र.न.मेहता हिंदी विद्यामंदिरात श्रीकृष्णाष्टमी उत्साहात


भुसावळ (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : हिंदी सेवा मंडळ संचालित श्री र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर,भुसावळ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तसेच शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवानिमित्त रंगभरण स्पर्धा, मटकी सजावट स्पर्धा, राधाकृष्ण युगल जोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या महामंत्री मधुलता शर्मा ोत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडियाले तसेच विद्यालयाच्या प्रधानाध्यापिका रिता शर्मा उपस्थित होतत्या.

मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर भगवान श्रीकृष्ण पूजा व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. नंतर महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.


स्पर्धांचा निकाल असा-
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रंगभरण स्पर्धा2026 निकाल
प्रथम- अमन सुपडू तडवी, अलमीरा सलमान तडवी, बिलाल खान नदीम खान, अरीशा सय्यद भुरा

मटकी सजावट स्पर्धा 2026
प्रथम- आरोही गायकवाड/शेख अलीना शकील, कश्यप शाहिद खान, उमेश पवार, -फरहान शेख मजहर

युगल जोडी स्पर्धा 2025 निकाल
प्रथम क्रमांक- सह्याद्री सचिन जयस्वाल-आर्यन मनोज बालू
द्वितीय क्रमांक, फैजा नदीम खान, गजाली नदीम खान, तृतीय क्रमांक
देवांश परदेशी-प्रियल कबाडे
इत्यादी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीकृष्ण जन्मोत्सव दहीहंडी फोडून उत्साहात साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन वैशाली चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन उमेश खोडपे यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !