ललवानी ग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंटतर्फे शिक्षक दिन उत्साहात

किडस् गुरुकुल व किडस नेस्टसच्या संस्थापक व शिक्षकांचा गौरव


भुसावळ (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : शहराजवळील ललवाणी अ‍ॅग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंटतर्फे माजी राष्ट्रपती, थोर तत्वचिंतक व महान शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. भुसावळातील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल व कुर्‍हेपानाचे येथील किड्स नेस्ट या शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार व सन्मान निसर्गाच्या सानिध्यात व मनमोकळ्या वातावरणात मनजिया रेस्टॉरंटच्या प्रांगणात करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष व कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम ललवाणी यांनी शिक्षक हा विद्यार्थी घडवण्यात नव्हे तर राष्ट्र घडविण्यात सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे भारताचे भविष्य आहेत आणि म्हणून भारताचे भविष्य घडवण्यामध्ये शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे नमूद केले.

प्रसंगी किड्स गुरुकुल ग्रुप भुसावळचे संस्थाचालक व उद्योजक अनिल कोटेचा, प्रमोद जैन तसेच किड्स नेस्टच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका पूनम फालक यांचादेखील सन्मान करण्यात आला.सर्व शिक्षकांनी या निसर्गरम्य वातावरणाचा,वनराईचा, गोशाळा, ट्रॅक्टर शिवार फेरी, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स या सर्वांचा मनमुराद आनंद लुटला.

निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी
किड्स गुरुकुलच्या मुख्याध्यापिका डॉली स्वामी यांनी ललवाणी ऍग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट बद्दल गौरवोदगार काढले. आसपासच्या परिसरातील गोप्रेमी, निसर्गप्रेमी व खवय्या प्रेमी यांच्यासाठी सुंदर रमणीय सोय उपलब्ध करून दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सर्व शिक्षकांप्रती एका शिक्षकाने दाखवलेला जिव्हाळ्याबद्दल प्रा.डॉ.डी.एम. ललवाणी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

पूनम फालक यांनी प्रा.ललवाणी यांना प्राईड ऑफ भारत व अ‍ॅग्रो टुरीझमला बेस्ट स्टार्टअप पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव केला. कर्मचारी गायत्री जगताप, मंदा तोरे, ईश्वर तोरे, महेश जगताप, अप्पा जगताप, सखाराम बारेला, रेस्टॉरंटचे आचारी मयूर महाजन यांनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !