पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ.उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ.वर्षा पाटील फॅशन महाविद्यालयात गणरायाचे आगमन


जळगाव (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : गोदावरी फाउंडेशन संचलित उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ वर्षा पाटील फॅशन महाविद्यालयात सोमवार, 14 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाचे महाविद्यालय परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.




प्राचार्य डॉ झोपे, फॅशनच्या प्राचार्य कविता देशमुख यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाने भारावून गेला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !