जामनेरात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर
जामनेर (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या जामनेर शाखेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला साधसंगत तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना गिरीष महाजन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितू पाटील, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या उपक्रमाला प्रल्हाद वाघ (मुखी), रतनसिंग परदेशी (सेवादल संचालक), आबा पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, रवींद्र शिंदे, शालिक घुले, देविदास पाटील, प्रवीण शिंदे, अनिल चंदनाणी, शंकर माळी, मनोज आवरकर, अनिल ठोसरे, आनंदा पाटील, नामदेव सुरळकर, ज्ञानेश्वर चौरे, जितू पाटील, शुभम ठोसरे, किरण शिंदे, नमन परदेशी, आशिष आवरकर आणि बंटी माळी यांच्यासह संत निरंकारी साधसंगत व सेवादल बंधू-भगिनींची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी साधसंगत आणि सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. रुबी स्टार हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच इन्चार्ज डॉ. विष्णू चव्हाण यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. मानवी जीवन वाचविण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणार्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
