सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन 5 ऑक्टोबर रोजी


जळगाव (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव यांच्या गणेश कॉलनी शाखेतील प्रशिक्षण सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव महेशकुमार गायकवाड यांनी दिली आहे.

सहकारी संस्थांशी संबंधित सर्व लोकशाही दिन स्वतंत्रपणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार असून, यापुढे अशा स्वरूपाचा स्वतंत्र जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी याच ठिकाणी आयोजित करण्यात येईल. सहकारी संस्थांशी संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !