जळगावात विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू


जळगाव (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : जळगाव शहराजवळील सावखेडा शिवारातील राधाकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळात शिकणार्‍या 14 वर्षीय विद्यार्थ्याचा विजेचा जोरदार धक्क्याने मृत्यू झाला. चिन्मय मंगेश सपकाळे असे मृताचे नाव आहे. बोरिंगची इलेक्ट्रिक पिन जोडण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदाय मंडळात शोककळा पसरली. चिन्मय मंगेश सपकाळे हा गेल्या दोन वर्षांपासून राधाकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळात वारकरी शिक्षण घेत होता. शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी बोरिंगची इलेक्ट्रिक पीन जोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला.

तपासणीअंती विद्यार्थी मृत घोषित
विद्यूत धक्का लागल्याचे लक्षात येताच संस्थेतील सहकार्‍यांनी चिन्मयला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !