जळगावातील अट्टल घरफोड्या शहर पोलिसांच्या जाळ्यात
रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपीला ताब्यात अटक : 28 हजारांची रोकड हस्तगत
जळगाव (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : जळगाव शहरातील निसार कॉलनीतील घरफोडीची जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उकल करीत अट्टल घरफोडी करणार्याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून 28 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. असमतखा इलियास खा कुरेशी (गेंदालाल मिल, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय घडले जळगावात
जळगावातील निसार कॉलनी परिसरातील गट क्रमांक 347/2, प्लॉट क्रमांक 27/2 मधील रहिवासी शेख अनिस शेख चाँद (35, व्यवसाय मोबाइल रिपेअरिंग) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने चांदीचे पायल, चांदीचे जोडवे, रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही घरफोडी सराईत गुन्हेगार इलियास खा कुरेशी (गेंदालाल मिल, जळगाव) याने केल्याची माहिती मिळताच त्यास रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली.





वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वात ग्रेडेड उपनिरीक्षक सुनील पाटील, एएसआय दीपक शिरसाट, हवालदार नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे आदींच्या पथकाने केली.
