पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी नाकाबंदीत पकडला आठ लाख 33 हजारांचा गुटखा : चाळीसगावातील संशयीताला अटक


पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा (सोमवार, 12 ऑक्टोबर 2026) : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान इनोव्हा वाहनातून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत वाहनासह एकूण 15 लाख 33 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. इनोव्हा चालक आबा विठ्ठल पाटील (54, माऊली नगर, चाळीसगाव) यास अटक करण्यात आली.

संशय आल्याने कारवाई
सोमवार, 12 ऑक्टोबर 2026 रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक नाकाबंदी करत असताना इनोव्हा (एम.एच.18. ए.जे.6525) ही पहूर येथून चाळीसगावच्या दिशेने भरधाव जात असताना पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने सुसाट वाहन नेल्याने पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित केसरयुक्त विमल पानमसाला आणि व्ही-1 सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी आठ लाख 33 हजार 600 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा तसेच सात लाख रुपये किंमतीची इनोव्हा गाडी जप्त केली. इनोव्हा चालक आबा विठ्ठल पाटील (54, माऊली नगर, चाळीसगाव) विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.






वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वरच्या सहा.पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात नाईक दीपक पाटील, कॉन्स्टेबल विकी इंगळे, कॉन्स्टेबल शाम हटकर, कॉन्स्टेबल मनोज महाजन आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !