जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनासाठी 10 उपकरणांची निवड

के.नारखेडे विद्यालयात तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना मिळाले व्यासपीठ


भुसावळ (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी उत्साहात पार पडली. या प्रदर्शनीतील विविध गटांमधून एकूण 10 उपकरणांची जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण, प्रयोगशील आणि समाजोपयोगी उपकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

यांची बक्षीस वितरणप्रसंगी उपस्थिती
प्रदर्शनीच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सेक्रेटरी प्रभाकर पाटील होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे आणि ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.धाडी, तुषार प्रधान, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, विज्ञान समितीचे एस. एस. अहिरे, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे सचिव सुनील वानखेडे आणि संगणक विभागाचे प्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते.






विज्ञान प्रदर्शनाच्या तालुका संयोजन समितीतील एस.एस.अहिरे,. सुनील वानखडे, बी.पी.वारके, एस.एम.पाटील, नीलिमा पाटील, प्रशांत वंजारी, बी.बी.जोगी, ए.एम.जटाळे यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक तालुका विज्ञान अध्यापक मंडळ विषय तज्ञ आणि आणि गटसाधन केंद्र स्टाफ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, के. नारखेडे कम्प्युटर इन्स्टिट्यूट स्टाफ, प्रमोद तळेले या सर्वांनी परिश्रम घेतले.

संधीचे सोने करा : डॉ.चंद्रकांत साळुंखे
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.चंद्रकांत साळुंखे म्हणाले की, जीवनात प्रत्येकाला विविध संधी मिळत असतात. त्या संधीचे सोने करून आपल्यातील कौशल्य सिद्ध केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा उपयोग करून ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलता विकसित करावी.

एआयमुळे शिक्षण अधिक रंजक व आनंददायी : डॉ.अनिल झोपे
प्राचार्य डॉ. अनिल झोपे म्हणाले की, बदलत्या युगानुसार शिक्षकही स्वतःमध्ये बदल घडवत आहेत. आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा स्वीकार करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर शिकून घेतला जात आहे. त्यामुळे अध्यापन अधिक रंजक, प्रभावी आणि आनंददायी होण्यास मदत होत आहे.

विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो : प्रभाकर पाटील
अध्यक्षीय भाषणात प्रभाकर पाटील म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. विद्यार्थी विविध समस्यांचा विचार करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि संशोधनवृत्ती वाढविण्यासाठी शालेय स्तरावर अशा उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे.

जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेली उपकरणे
उच्च प्राथमिक गट- प्रथम- चैताली किरण कोळी (जिल्हा परिषद शाळा, सावतर, निंभोरा) जैवखत निर्मिती, द्वितीय- भाविका किशोर पाटील (अरुणोदय माध्यमिक विद्यालय, बोहर्डी) फ्लूड डिझास्टर मॅनेजमेंट, तृतीय- कार्तिक शशिकांत झांबरे (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ) स्मार्ट डस्टबिन. उत्तेजनार्थ- ऋषी जितेंद्र फुलमाळी, आदर्श हायस्कूल भुसावळ, (इव्हन अ‍ॅण्ड ऑड नंबर). दिव्यांग गट- पायल अनिल कोळी (नेहरू विद्यामंदिर, तळवेल) गॅस अलार्म सिस्टीम, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट- प्रथम- आज्ञा विकास पाटील (सर्वोदय हायस्कूल, किन्ही) जैविक कीटकनाशक, द्वितीय- दर्शन नरेश कुकरेजा (सेंट अलॉयसियस हायस्कूल, भुसावळ), कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), तृतीय- साहिल शंकर झोपे (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव) स्मार्ट ईव्ही पॉवर बँक,
उत्तेजनार्थ- अहेते श्याम शेख अफजल, डी.एल.हिंदी हायस्कूल भुसावळ.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गट- प्राथमिक शिक्षक गट शशिकांत प्रमोद झांबरे (के. नारखेडे विद्यालय, भुसावळ) थ्रीडी ऑब्जेक्ट, माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गट राजेंद्र ओंकार चौधरी (महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय, वेल्हाळे), विज्ञान शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गट- आसीफ् भिकारी तडवी (के. नारखेडे विद्यालय, भुसावळ) अन्नधान्यातील भेसळ ओळखणे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन राणे यांनी केले, तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले.
विद्यार्थी मनोगत आदर्श हायस्कूल भुसावळचा विद्यार्थी ऋषी फुलवाणी याने तर शिक्षक मनोगत डी. एल.हिंदी शाळेच्या जयश्री सूर्यवंशी आणि परीक्षक मनोगत रवींद्र युवराज पाटील यांनी व्यक्त केले. विजेत्या स्पर्धकांच्या यादीचे वाचन आभार व उपस्थितांचे आभार तालुका संयोजन समिती सदस्य श्री सुनील वानखडे यांनी मानले .


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !