जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
विविध शाळांचे संघ विजयी
जळगाव (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव; जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका आणि जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धा 2026-27 ला सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील बास्केटबॉल मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले व मुलींच्या विविध शालेय संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी उपप्राचार्य, कोटेचा महाविद्यालय, भुसावळ तसेच माजी विद्यापीठस्तरीय बास्केटबॉल खेळाडू यशवंत देसले (नाना सर) यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. निलेश पाटील, डॉ.प्रकाश पाचपांडे, विकास महाजन, अमृतकर, रुपेश जगताप, वाल्मिक पाटील, लौकिक मुंदडा, मयूर लाहोरी, राजेंद्र भांडारकर यांच्यासह क्रीडाप्रेमी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.





उद्घाटन समारंभानंतर विविध गटांतील सामने खेळविण्यात आले. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात वर्ल्ड स्कूल, भुसावळने ए.बी.हायस्कूल, चाळीसगावचा 12-2 असा पराभव केला. किड्स गुरुकुलने अनुभूती शाळेवर 4-2 अशी मात केली. वर्ल्ड स्कूल, पाचोरा आणि शानबाग स्कूल यांनीही आपापले सामने जिंकले. गोसे हायस्कूल, पाचोरा संघाने शिंदे इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा यांच्यावर 4-0 अशी मात केली. तसेच किड्स गुरुकुलने लॉर्ड गणेश स्कूल, जामनेरवर विजय मिळविला, तर वर्ल्ड स्कूल, पाचोरा संघाने जिजामाता स्कूल, एरंडोलवर मात केली.
14 वर्षांखालील मुलींच्या गटात किड्स गुरुकुलने काशिनाथ पलोड शाळेवर विजय मिळविला. शिंदे इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा संघाने शानबाग स्कूलवर, तर लॉर्ड गणेश स्कूल, जामनेर संघाने वर्ल्ड स्कूल, भुसावळवर विजय मिळविला. रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, मोहाडी आणि सेंट मेरी हायस्कूल, अमळनेर यांच्यातील सामन्यात रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलने बाजी मारली. अन्य एका सामन्यात जिजामाता स्कूल, एरंडोल संघाने किड्स गुरुकुल, सावखेडा संघावर विजय मिळविला.
मुलांच्या प्रथम विजेता संघ वर्ड स्कूल पाचोरा द्वितीय ए बी स्कूल चाळीसगाव आणि तृतीय संघ गो से हायस्कूल पाचोरा तर मुलींच्या प्रथम विजेता संघ शिंदे इंटरनॅशनल स्कूल द्वितीय विजेता संघ रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल मोहाडी आणि तृतीय विजेता संघ जिजामाता हायस्कूल एरंडोल असा अंतिम निकाल राहिला.
सूत्रसंचालन रुपेश जगताप तर आभार धनसुख पटेल यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी कृष्णा हटकर, किशोर डोंगरे, ऋषिकेश रावेरकर, सागर महाजन, रोहित कांबळे, निशांत बागुल, अजय गवळी, गणेश बागडे, तुषार बेंडवाल, आदिनाथ सोनार, पूर्वा हटकर आणि यश सोनवणे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील शालेय बास्केटबॉल खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध झाली असून, जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
