निम येथील महिलेचा विनयभंग : आरोपीला अटक
अमळनेर (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : अमळनेर तालुक्यातील निम येथे महिला घरात एकटी असल्याची संधी साधत भगवान दत्तू कोळी याने 11 रोजी सकाळी आठ वाजता महिलेशी अंगलट करीत विनयभंग केला.
यावेळी आरोपीला महिलेने विरोध करीत आरडा-ओरड केल्यानंतर महिलचेा पती घरात आल्यानंतर तिची सुटका झाली. या प्रकरणी आरोपी भगवान विरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. तपासाधिकारी एएसआय संजय पाटील यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.





