भुसावळात दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफाला तीन लाखांचा गंडा

अज्ञात बुरखाधारी महिलेचा शोध : मंगळसूत्रासह लांबवले पेंडल


 

भुसावळ (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : दागिने पहाण्याच्या बहाण्याने सराफा दुकानात बुरखा घालून आलेल्या अज्ञात महिलेने सराफा दुकानदाराकडील तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवल्याचा प्रकार शहरात घडल्याने सराफा वर्तुळात खळबळ उडाली.






अशी झाली फसवणूक
शहरातील सराफा बाजारात राजेश बालमुकूंद अग्रवाल (63) यांचे सराफा दुकान आहे. या दुकानात 9 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास बुरखा घालून अनोळखी महिलेने प्रवेश केला. कानातले दागिने घेण्याचे महिलेने सांगितल्यानंतर दुकानाने दागिने पाहण्यास सुरूवात केल्यानंतर मंगळसूत्र दाखवण्याची मागणी केली. यावेळी दुकानदाराने मंगळसूत्र दाखवण्यास सुरूवात केल्याने दुकानदाराचे लक्ष हटताच महिलेने एका बॉक्समधील 19.310 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व त्याला चार ग्रॅम वजनाचे पेंडल असे एकून तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र बॅगेत टाकले. नंतर ही महिला निघून गेली.

सीसीटीव्ही अज्ञात आरोपीचा शोध
काही वेळेनंतर मंगळसूत्र नसल्याचे सराफा दुकानदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीताचा शोध सुरू केला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !