रावेर शहरात श्री खाटू श्यामजींचा 17 रोजी भव्य दरबार व संकीर्तन


भुसावळ (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : रावेर शहरातील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे रावेर शहरासाठी पहिल्यांदाच राजस्थानातील श्री खाटू श्यामजी यांचा भव्य दरबार व श्याम संकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, 17 ऑक्टोबर संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. कार्यक्रमासाठी मोरवी नंदन सरकार यांचा श्याम दरबार व अखंड ज्योत लागणार आहे. या कार्यक्रमात भजनांची प्रस्तुती देण्यासाठी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भजन गायिका श्रृतिका जी राठोड व कपिलजी नामदेव येणार आहेत.

म्युझिकल ग्रुप हरदा येथील आहे. भगवान श्रीकृष्णांचा वरदान असलेले श्री खाटू श्यामजी यांचा या कलियुगात प्रचार व प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे व अनेक भाविक भक्त दररोज रावेर व परिसरातून खाटू श्याम या ठिकाणी जात असतात परंतु काही भक्तांचे तेथे जाणे होत नाही याची जाणीव ठेवून सार्वजनिक नवदुर्गा उत्सव रावेर या मंडळाने रावेर येथेच श्री खाटू श्यामजी बाबा यांचा दिव्य दरबार ज्योत कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या सुमधुर भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून रावेर येथेच सर्वांना बाबांचे दर्शन होईल. या कार्यक्रमाचा लाभ रावेर व परिसरातील सर्व भावी भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, उपाध्यक्ष संदीप महाजन, सचिव अजिंक्य वाणी, खजिनदार विपुल अग्रवाल, सल्लागार रवींद्र पाटील, नगरसेवक नितीन महाजन, व्यापारी तुषार अग्रवाल व सदस्य अक्षय मानकर, डी.डी.वाणी, अशोक गायकवाड, हर्षल महाजन, अर्पित अग्रवाल, मिलिंद महाजन, सोनू अग्रवाल यांनी केले आहे.






21 रोजी भव्य मेळावा
सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाची गेल्या पाच दशकांची अखंड परंपरा आहे. दुर्गा मातेची मूर्ती ही नवसाला पावणारी असल्याची श्रद्धा आहे. दरवर्षी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाकडून वेगवेगळे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संपूर्ण शहरातून सार्वजनिक मंडळाला एक वेगळाच मान असतो. दरवर्षी मंडळाकडून विधीवत स्थापना सत्यनारायण महापूजा यज्ञ व भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते. यंदा बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी रावेर शहरातून भव्य मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !