संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयात संगीत कला कक्षाचे उद्घाटन


भुसावळ (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : शहरातील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगे महाराज हिंदी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलात्मक व बहुमुखी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘संगीत कला कक्षा’ चे भव्य उद्घाटन बुधवार. 14 रोजी अत्यंत उत्साही वातावरणात झाले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या हिंदी सेवा मंडळाच्या महामंत्री मधुलता शर्मा यांनी फित कापून आणि व्दीपप्रज्वलन करूण संगीत कक्षाचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी हिंदी सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष अ‍ॅड.महेशदत्त तिवारी, शाळेचे प्रिंसिपल के.बी.सक्सेना, पर्यवेक्षक एम.आर.शहा, मनोज झंवर यांची विशेष उपस्थिती होती.






विद्यार्थी आणि शिक्षकांचे उत्तम सादरीकरण
उद्घाटनानंतर लगेचच नवीन संगीत कक्षात संगीतमय मेळावा झाला. शाळेच्या संगीत शिक्षिका आणि सांस्कृतिक प्रमुख मनोरमा ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीचा विद्यार्थी विकास अहिरे आणि इयत्ता आठवीचा विद्यार्थी अरमान खान यांनी अतिशय सुंदर आणि सुरेल संगीत सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व गायनाला उपस्थित पाहुणे व शिक्षकांनी भरभरून दाद दिली व त्यांना प्रोत्साहन दिले.

संगीतासह कला जीवनात सकारात्मक उर्जा देतात
मधुलता शर्मा आणि अ‍ॅड.महेशदत्त तिवारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिक्षणासोबतच संगीत आणि कला जीवनात सकारात्मक ऊर्जा देतात. हा नवा संगीत कक्ष भविष्यात अनेक उत्कृष्ट कलाकार घडवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
वरिष्ठ लिपिक सतीश कवटे, गायत्री ओगले, पूजा सोनार, प्रांजली माळी यांनी परिश्रम घेतले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !