टाकरखेडा शिवारात महिलांना मारहाण करून सोन्याची पोत हिसकावली : संशयीताला अटक
यावल (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील टाकरखेडा गावाच्या शेत -शिवारात भालशिव फाट्याजवळ यावल शहरातील शेतमजुरी करण्यासाठी गेलेल्या महिलांना शिविगाळ करत मारहाण करीत एका महिलेची सोन्याची पोत हिसकवणार्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला यावल पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी घडली.
काय आहे प्रकरण ?
टाकरखेडा, ता.यावल गावाच्या शेतशिवारात भालशिव फाट्याजवळ उषाबाई उदयसिंग पाटील (शिवाजीनगर, यावल) ही महिला तसेच उज्वला विजय भगत, शारदाबाई सतीश महाजन, सीमा मुरलीधर पाटील, इंदुबाई राजेंद्र पवार या महिला शेती कामे करून यावल येथे घरी येण्यासाठी निघाल्या असताना महिलांचा दुचाकीद्वारे येऊन रामदास नामदेव कोळी (48, रा.भालशिव, ता.यावल) याने रस्ता अडवला. या सर्व महिलांना त्याने मारहाण केली तसेच उषाबाई पाटील यांचे सोन्याची 21 हजार रुपये किंमतीची पोत चोरून नेली.





या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास कोळी याला पोलिसांनी अटक केली. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.जे. शेख करीत आहे.
