फैजपूरात महिलेसह चौघांना मारहाण करीत जातीवाचक शिविगाळ : 20 संशयीतांविरोधात गुन्हा


फैजपूर (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) :  फैजपूर शहरातील लक्ष्मी नगरातील शीतल अकॅडमीजवळील वळणावर हॉर्न मोठ्याने का वाजवला ? अशा बोलण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून 47 वर्षीय फिर्यादीसह तिच्या आईला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. शिवाय भाचासह चालकालाही संशयीतांनी मारहाण केल्याचा आरोप असून फिर्यादीच्या दिड तोळ्याच्या दोन सोन्याच्या चैन गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात  20 जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
फैजपूर शहरातील लक्ष्मीनगर भागातील शीतल अकॅडमीच्या वळणावरून कारचा हॉर्न जोराने का वाजवला ? या कारणावरून वाद झाल्यानंतर 47 वर्षीय मागासवर्गीय समाजातील महिलेला आणि तिच्या आईला शिविगाळ करून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना दिनांक 20 सप्टेंबर रोजी रात्री घडली होती. तक्रादाराचा भाचा, चालकासह तिघे जण गणपती पाहून परतल्यानंतर हॉर्न वाजवल्याच्या वादातून संशयीतांनी वाद करीत जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप आहे.






या संशयीतांविरोधात गुन्हा
याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंगळवार, 13 ऑक्टोबर रोजी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत सिद्धेश्वर लिलाधर वाघुळुदे, संदीप नारायण भारंबे, भावना संदीप भारंबे, भारती सोपान चौधरी, हेमराज पुरूषोत्त चौधरी, पराग पांडुरंग चौधरी, पराग चौधरी यांची पत्नी (नाव माहित नाही), पांडुरंग चौधरी, प्रफुल्ल सदाशीव चौधरी, राहुल रवींद्र महाजन, राहुल महाजन यांची पत्नी (नाव माहित नाही), केतन उमाकांत भंगाळे, अक्षय नीळकंठ बोरोले, धीरज अनिल नारखेडे, विशाल भारंबे, भारती संजय पाटील, संजय डिगंबर पाटील, देवेंद्र अशोक विसपुते, पियुष संजय बेंडाळे, आकाश विलास चौधरी (सर्व रा.फैजपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !