भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
भुसावळ (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 15 ऑक्टोबर 2026 हा दिवस डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी मिसाईल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सर्व प्राध्यापकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दररोज करा पुस्तकांचे वाचन
याप्रसंगी डॉ रमेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्या पुस्तकांचे वाचन दररोज केले पाहिजे तसेच विद्यार्थ्याची प्रगती वाचनामुळे होऊ शकते व ग्रंथ हेच आपले खरे मित्र असतात, असे प्राचार्य जोशी म्हणाले. प्रा.अनुपम शर्मा यांनी विद्यार्थ्यांना डॉ.अब्दुल कलामजींचा संक्षिप्त परिचय करून दिला. यशस्वीतेसाठी प्रा.अनुपम शर्मा, प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





