भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात


भुसावळ (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये गुरुवार, 15 रोजी सकाळी 8.30 वाजता माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन तसेच ‘जागतिक हात धुवा दिन’ साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांना पुस्तके भेट
शाळेच्या पर्यवेक्षिका राखी बढे यांनी स्व.डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, भाषा विकास यासाठी वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन, व्याख्यान आयोजन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी एकमेकांना या निमित्ताने पुस्तके भेट दिली. पुस्तक प्रदर्शन, सामूहक वाचन, व्याख्यान, चर्चासत्र अभिवाचन असे विविध कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांनी यात एकमेकांना प्रश्न विचारले, चर्चा केली. मुलांना स्वच्छतेचे महत्व पटविणे तसेच संसर्गजन्य आजार दूर ठेवणे, सार्वजनिक आरोग्य सुदढ करणे, यासाठी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षिका-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होत्या.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !