भुसावळात सराफा व्यापार्‍याचे लक्ष चुकवून तीन लाखांचे मंगळसूत्र चोरणार्‍या अकोल्यातील महिलेला अटक

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तीन लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल हस्तगत


भुसावळ (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : दागिने पाहण्याच्या बहाण्याने सराफा दुकानात बुरखा घालून आलेल्या अज्ञात महिलेने सराफा दुकानदाराकडील तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवल्याचा प्रकार शहरातील सराफा बाजारात घडला होता. समांतर तपासादरम्यान जळगाव गुन्हे शाखेने अकोल्यातील महिलेला बेड्या ठोकत मंगळसूत्र जप्त केले. मुमताज परवीन अब्दुल (नेहरु नगर, सोळाशे प्लॉट, अकोट फाईल, अकोला) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अशी झाली फसवणूक
भुसावळातील सराफा बाजारात राजेश बालमुकूंद अग्रवाल (63) यांचे सराफा दुकान आहे. या दुकानात 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास बुरखा घालून अनोळखी महिलेने प्रवेश केला. कानातले दागिने घेण्याचे महिलेने सांगितल्यानंतर दुकानाने दागिने पाहण्यास सुरूवात केल्यानंतर मंगळसूत्र दाखवण्याची मागणी केली. यावेळी दुकानदाराने मंगळसूत्र दाखवण्यास सुरूवात केल्याने दुकानदाराचे लक्ष हटताच महिलेने एका बॉक्समधील 19.310 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व त्याला चार ग्रॅम वजनाचे पेंडल असे एकून तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र बॅगेत टाकले. नंतर ही महिला निघून गेली. काही वेळेनंतर मंगळसूत्र नसल्याचे सराफा दुकानदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली.






तांत्रिक विश्लेषणावरून कारवाई
सीसीटीव्ही फुटेज तपासणीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत अकोल्यापर्यंतचा माग काढत मुमताज परवीन अब्दुल (नेहरु नगर, सोळाशे प्लॉट, अकोट फाईल, अकोला) या महिलेला अटक केली. आरोपी महिलेने चोरीची कबुली देत तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र काढून दिले.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार गोपाल गव्हाळे, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार विकास सातदिवे, महिला हवालदार अश्विनी सावकारे, हवालदार संदीप चव्हाण, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, चालक रिझवान शेख आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !