निंभोरा बुद्रुक शिवारात रेल्वे अपघातात 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू
भुसावळ (गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026) : भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक शिवारात रेल्वे अपघातात 25 ते 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. हा प्रकार बुधवार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 12.55 वाजेनंतर उघडकीस आला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रेल्वे रुळाखाली आढळला मृतदेह
रेल्वे कर्मचारी रंजन कुमार शर्मा यांनी लेखी मेमोद्वारे भुसावळ तालुका पोलिसांना निंभोरा बुद्रुक शिवारातील अप रेल्वे मार्गावर खांब क्रमांक 450/23 ते 450/25 दरम्यान एका अनोळखीचा मृतदेह असल्याची माहिती बुधवारी रात्री उशिरा कळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली. अनोळखी तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृताच्या खिशात 13 ऑक्टोबरचे नागपूर मेट्रोचे प्रजापत नगर ते डोईसार विषाय गावाच्या प्रवासाचे तिकीट आढळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मृताच्या अंगावर केवळ घटना घडली त्यावेळी टी शर्ट व बर्मुडा पँट असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार योगेश पालवे करीत आहेत.





