अमळनेर तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात
शेतकर्यांनी घेतला सुटकेचा श्वास ः सावजाच्या शोधात पिंजर्यात अडकला बिबट्या
अमळनेर (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे परिसरात चार पाच जनावरे फस्त करणार्या बिबट्याने संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण केली होती. वनविभागाने त्याचा मागोवा घेत त्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरे लावले तर शुक्रवार, 16 रोजी पहाटे बिबट्या पिंजारी मुस्लिम कब्रस्थानमधील पिंजर्यात अडकताच या परिसरातील शेतकर्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
बिबट्याची संपूर्ण परिसरात दहशत
अमळनेर तालुक्यातील शिरूड, मंगरूळ, पिंपळे, ढेकू रस्ता, धार रस्ता, अंतुर्ली रंजाणे, ताडेपुरा, टाकरखेडा परिसरात बिबट्याचा वावर
असल्याने या परिसरातील शेतकरी धास्तावले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण, उपवनसंरक्षक राम धोत्रे, सहाययक वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गुलाब पिंजारी, वनरक्षक दुर्गादास वानखेडे, योगेश पाटील, मनीषा मोरे, वनमजुर प्रवीण पाटील, समाधान पाटील, मयुर पाटील दररोज गस्त घालून विविध ठिकाणी पिंजरे लावत होते.





सावजाच्या शोधात बिबट्या जाळ्यात
पिंजर्यामध्ये बिबट्याला शिकारीसाठी माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांनी बकर्या उपलब्ध कून दिल्या तर सरपंच सचिन पाटील यांनीही सहकार्य केले होते. बिबट्या विविध ठिकाणी भटकंती करीत असल्याने वनपाल गुलाब पिंजारी दररोज रात्री उशिरपर्यंत आपल्या कर्मचार्यांसह आणि पहाटे गस्त घालत होते. त्याचा वावर पाहून तेही पिंजर्याची सातत्याने जागा बदलवत होते. शुक्रवार, 16 रोजी पहाटे तांबेपुरा अंतुर्ली रस्त्यावर असलेल्या पिंजारी मुस्लिम कब्रस्थानमध्ये लावलेल्या पिंजर्यात सावदाच्या शोधात आलेल्या बिबट्या जाळ्यात अडकला. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले असून बिबट्याला लवकरच सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
