भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी


भुसावळ (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विभागांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेत दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश मिळवले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करीत त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंनी मिळवले यश
या स्पर्धेत राजपाल दिलीप दाभाडे याने 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर चार बाय चारशे मीटर रिले संघात सहभागी होत प्रथम क्रमांक पटकावला. लोकेश गजानन जावरे याने चार बाय 400 मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. प्रीतम रवींद्र सोनवणे याने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक तर चार बाय चारशे मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. कुणाल समाधान चौथे याने 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला व चार बाय चारशे मीटर रिले संघाच्या प्रथम क्रमांक पटकावला. प्रसाद सुनील मराठे यानेही चार बाय चारशे मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणार्‍या संघाचे प्रतिनिधित्व केले. दिगंबर साहेबराव कोळी याने गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी यश मिळवले.






महाविद्यालयाचा वाढवावा गौरव
खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली आहे. खेळाडूंनी आगामी विद्यापीठात होणार्‍या विभागीय स्पर्धांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा गौरव वाढवावा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी केले. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.राजेश ढाके उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !