मोहराळे-सावखेडासीम रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले


यावल (शनिवार, 16 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील मोहराळे या गावातून सावखेडासीम जाणार्‍या रस्त्यावर दर्गाजवळ दोघे ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून वाळू चोरी करून नेत असताना यावल पोलिसांनी वाहन जप्त केले. पथकाने ट्रॅक्टर, ट्रॉली, वाळू असा एक लाख 58 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध गौण खनिज रडारवर
मोहराळे गावातून सावखेडासीम जाणार्‍या रस्त्यावर दर्गा असून त्या समोरून एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून त्यामध्ये वाळू चोरी करून नेली जात होती. यावल पोलिसांच्या पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना नव्हता. यावल पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा एक लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.






या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहायक फौजदार विजय पाचपोळे यांच्या फिर्यादीवरून वैभव एकनाथ सपकाळे व चंद्रकांत देवराम कोळी (दोघे रा.विदगाव ता.जि. जळगाव) यांच्याविरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !