धरणगाव शहरातील मातोश्री नगरात घरफोडी : 54 हजारांची रोकड लांबवली


धरणगाव (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : शहरातील मातोश्री नगरातील बंद घराला अज्ञात चोरट्यांनी टार्गेट करीत 54 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला टार्गेट
धरणगावच्या मातोश्री नगरात गणेश विठ्ठल बच्छाव (38) हे नोकरदार वास्तव्यास आहेत. 14 ते 15 दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत चोरट्याने घराच्या कपाटातील 54 हजारांची रोकड लांबवली. घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर गणेश बच्छाव यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.






पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !