हिरापूरजवळ दुचाकी अपघात : नायडोंगरीतील प्रौढ जागीच ठार


चाळीसगाव (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026)  :  चाळीसगाव-नायडोंगरीहून चाळीसगावकडे येणार्‍या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावर हिरापूर रेल्वे स्टेशनजवळ घडला. गोकुळ गबरू राठोड (45, नायडोंगरी, ता.नांदगाव) असे मृताचे नाव आहे.

राठोड हे गुरुवारी सायंकाळी नायडोंगरीहून चाळीसगावकडे आपल्या दुचाकीने येत असतांना हिरापूर गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास हवालदार तुकाराम चव्हाण करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !