अमळनेरात कपड्यांचा ट्रकला आग लाखोंच्या कपड्यांची राखरांगोळी


अमळनेर (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : शहरात कपड्यांनी भरलेल्या आयशर ट्रकला भल्या पहाटे आग लागल्याची घटना शनिवार, 17 रोजी पहाटे पावणे पाच वाजेला धरणगाव रस्त्यावरील सती माता मंदिराजवळ घडली. या आगीत लाखो रुपये किंमतीचे कपडे जळून खाक झाले. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

अमळनेर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलीस सिद्धांत शिसोदे यांना कपड्यांच्या ट्रकला आग लागल्याची माहिती कळाल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला सूचित केले. सुरतच्या साईबाबा ट्रान्सपोर्टतर्फे पाठवण्यात आलेला आयशर ट्रक (डी.एन.09 व्ही.9153) द्वारे मोठ्या प्रमाणावर कपडे आणण्यात आले होते मात्र या ट्रकला लाग लागल्याने संपूर्ण कपडे खाक तर वाहनाचेही नुकसान झाले.






अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी वाहन चालक फारूक शेख, भिकन पठाण, फायरमन दिनेश बिर्‍हाडे, आनंदा झिंम्बल, आकाश संदानशिव यांना घटनास्थळी पाठवल्यानंतर आग विझवण्यात आली मात्र व्यापार्‍याचे संपूर्ण कपडे खाक झाले. सुदैवाने चालकाने उडी मारून दिल्याने त्याचा जीव बचावला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !