भुसावळात भंगार वेचणार्या अनोळखीचा अति मद्य सेवनाने मृत्यू !
महिनाभरात तीन अनोळखींचा मृत्यू : सततच्या घटनांनी शहरात खळबळ
भुसावळ (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : भंगार वेचून उदरनिर्वाह करणार्या शहरतील 30 ते 35 वर्षीय पुरूषाचा अतिमद्य प्राशनानंतर गटारीत पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 17 रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या महिनाभराच्या काळात शहरातील विविध भागात आतापर्यंत तीन अनोळखींचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अनोळखींची ओळख पटवून मृत्यूचे कारण स्पष्ट करण्याची अपेक्षा आहे.
काय घडले भुसावळात ?
सूत्रानुसार, मयत अनोळखी हा शहरातील वरणगाव रोड परिसरात वास्तव्याला होता शिवाय दिवसभर विविध भागात पडलेले भंगार वेचून उदरनिर्वाह करीत होता. संबंधिताला दारूचे व्यसनही असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वरणगाव रोडवरील पंपाजवळील गटारीत अनोळखी व्यक्ती मृत असल्याची माहिती नागरिकांना कळताच विविध अफवा उडाल्या. बाजारपेठ पोलिसांनी जावून प्रत्यक्षात खातरजमा केल्यानंतर मयत हा भंगार वेचणारा असल्याचे व त्यास दारूचे व्यसन असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करीत ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी हलवला. काझी लोमान नावेद (भुसावळ) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोपान पाटील करीत आहेत.





बाजारपेठ व शहर हद्दीतही आढळला होता मृतदेह
गत महिन्यात रविवार, 20 सप्टेंबर रोजी रानातील महादेव मंदिराजवळील नाल्याच्या भागात 55 वर्षीय अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. अनोळखीचा घातपाताने की नैसर्गिक कारणाने मृत्यू झाला ? याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही तर शहर हद्दीतील रेल्वेच्यानर्मदा कॉलनीतील रेल्वेच्या जुन्या वसाहती कुजलेल्या अवस्थेतील इसमाचा मृतदेह आढळल्याचा प्रकार गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी अनोळखीचा मृतदेह आढळला होता. कुत्र्यांनी हा मृतदेह येथे ओढून आणून टाकल्यानंतर दुर्गंधी सुटताच घटना समोर आली होती. या मृतदेहाची अद्यापी ओळख पटलेली नाही.
