भुसावळात दरोड्यापूर्वीच त्रिकूट जाळ्यात : गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह दोन दुचाकी जप्त

बाजारपेठ पोलिसांची कारवाई ; आरोपींचे तीन साथीदार पसार, संशयीतांना पाच दिवसांची पोलीस कोठडी


गणेश वाघ
भुसावळ (शनिवार, 17 ऑक्टोबर 2026) : भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या त्रिकूटाला पोलिसांनी अटक केली असून अन्य तीन साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले. आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चाकू, मिरची पावडर, दोरी आणि दोन मोटारसायकली मिळून एक लाख 58 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची अर्थात 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरोड्याचा डाव उधळला
बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी काही संशयीत दरोड्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष रात्री 8.40 वाजेच्या सुमारास वांजोळा रोडवरील म्हाडा कॉलनी, स्वामी विहार परिसरातील कमान परिसरात धाव घेतल्यानंत दोन दुचाकीवर सहा संशयीत आढळले मात्र पोलिसांना पाहताच तीन संशयीत पसार झाले तर पोलिसांनी घटनास्थळावरून तीन संशयीतांना दोन दुचाकींसह ताब्यात घेतले.






या आरोपींना अटक
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयीतांनी आपली नावे रोहनसिंग सतनामसिंग बावरा (24, भिरूड हॉस्पीटलमागे, भुसावळ), आर्यन सुनील मोरे (22, भिरूड हॉस्पीटलमागे, भुसावळ) व विशाल सुपडू ठाकरे (20, कन्हाळा बु.॥, दीपनगर, ता.भुसावळ) असल्याचे सांगितले. आरोपींच्या चौकशीत त्यांनी पसार साथीदारांची नावे अजितसिंग समशेरसिंग भाटीया, बलजितसिंग मंगलसिंग किच्ची (छाबडा, दोन्ही रा.भिरूड हॉस्पीटलमागे, कृष्णानगर, भुसावळ) व बलजितसिंग छाबडा (भुसावळ) असल्याचे सांगितले. दरम्यान, अटकेतील आरोपींना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 21 पर्यंत अर्थात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गावठी कट्ट्यासह दरोड्याचे साहित्य जप्त
अटकेतील आरोपींच्या झडतीत 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, दोन हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुसे, मिरची पावडर, पाचशे रुपये किंमतीचा लोखंडी चाकू, 800 रुपये किंमतीची स्टील फोल्डींग स्टीक, 30 फूट लांबीचा दोर, 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.एफ.1879) व 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ई.एम.0918) जप्त करण्यात आली. पोलीस नाईक सोपान पाटील यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात दरोड्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद सैय्यद अली करीत आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
पही कारवाई पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार कांतीलाल केदार, कॉन्स्टेबल चंद्रकांत रायपूरकर, महेंद्र पाटील, सचिन चौधरी, मोहसीन शेख, भूषण चौधरी, योगेश माळी, प्रशांत सोनार, अक्षय कोतकर, सोपान पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !