फोटो व्हायरलची धमकी देत अल्पवयीनावर अत्याचार : भडगावातील तरुणाला अटक


भडगाव (रविवार, 18 ऑक्टोबर 2026) : फोटो व्हायरलची धमकी देत एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर 19 वर्षीय तरुणाने ठिकठिकाणी अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली.

काय घडले तरुणीसोबत ?
एका गावातील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय तरुणीसोबत आरोपी तरुणाने काढलेले फोटो व्हायरलची धमकी देत भीती घातली व अल्पवयीनावर शेता शेतात, पत्र्याच्या घरात तसेच पाचोरा शहरातील कॅफेत अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना फेब्रुवारी 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान घडली. पीडीतेने भडगाव पोलिसात धाव घेतल्यानंतर दुर्गेश गोपाल पाटील (19, भडगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक महेश टाक करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !