पुनगाव फाट्यावर पैसे देण्यास नकार देणार्‍या कामगारास मारहाण : तिघांविरुद्ध गुन्हा


यावल (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी गावाजवळील पुनगाव फाटा परिसरात कामगारांकडे पैशांची मागणी करण्यात आली मात्र पैसे न मिळाल्यानंतर संशयीताने जीवे मारण्याची धमकी देत तरुणास मारहाण केली. ही घटना शनिवार, 17 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी घडली. या घटनेत एका तरुणाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. तसेच परिसरातील ट्युबलाईट, फोकस आणि वाहनांच्या दिव्यांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण ?
कोळन्हावी गावाजवळील पुनगाव फाटा परिसरातील एआरआरडी इन्फ्रा आरएमसी प्लांटवर ऑपरेटर प्रेमानंद धाकड हा काम करतो. त्याच्याकडे त्याचा भाऊ सुलतान रघुवीर धाकड हा आला असता शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या धाकड बंधू व इतर कामागार सोबत होते. अचानक तेथे संजय मुरलीधर बाविस्कर, जितेंद्र बळीराम सोनवणे उर्फ राणा आणि रामकृष्ण सुकदेव बाविस्कर हे तिघे तेथे आले. त्यांनी काम करण्याच्या मोबदल्यात पैसे देण्याची मागणी केली आणि पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी देत त्यांना व तेथे असलेल्या शुभम एकनाथ सपकाळे, सचिन रवींद्र सपकाळे, रोशन भूपेंद्र सिंग आणि नितेशकुमार अजय यादव, साहेबराव पुंडलिक बाविस्कर आणि अमोल सुधाकर सैंदाणे अशांना काठीने मारहाण केली. सर्व जण तेथून जीव वाचवून पळून गेले मात्र सुलतान धाकड हा एकटा सापडला. त्यास संजय बाविस्कर याने लाकडी काठीने उजव्या हातावर गंभीर दुखापत केली तसेच जितेंद्र बळीराम सोनवणे ऊर्फ राणा आणि रामकृष्ण सुकदेव बाविस्कर यांनी तक्रारदारासह तेथे उपस्थित असलेल्या इतर कामगारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावल पोलिसात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.






ट्युबलाईट व वाहनांच्या दिव्यांची तोडफोड
मारहाणीदरम्यान संबंधित तिघांनी परिसरातील ट्युबलाईट, फोकस तसेच वाहनांच्या दिव्यांची तोडफोड करून नुकसान केले तसेच तेथे असलेल्या तात्पुरत्या कार्यालयातुन साहित्य व त्या कार्यालयास कुलूप लावुन चाबी घटनास्थळावरून निघून गेले, असे तक्रारीत नमूद आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !