यावल शहर व तालुक्यात चार दिवस दुर्गा विसर्जन मिरवणुका


यावल (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : यावल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या विविध गावांमध्ये 21 ऑक्टोबरपासून दुर्गा विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. चार दिवस शहर व तालुक्यात ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका चालणार आहेत. यात यावल शहरात 22 ऑक्टोबरला विसर्जन मिरवणुका आहेत. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण 281 मंडळ 21 ऑक्टोबरपासून ते 24 ऑक्टोबरपर्यंत आई दुर्गेला निरोप देतील.

57 गावांमध्ये आई दुर्गेला निरोप
यावल येथील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या 57 गावांमध्ये व यावल शहरांमध्ये येत्या 21 ऑक्टोबरपासून शारदीय दुर्गोसवाच्या समारोपाची तयारी सुरू होणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत मिरवणुका चालणार आहेत. यात टप्प्याटप्प्याने विविध गावांमध्ये आई दुर्गेला निरोप दिला जाणार आहे. बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी पाच गावात विसर्जन मिरवणुका होतील तर गुरुवार, 22 ऑक्टोबर रोजी यावल शहरासह 17 गावांमध्ये विसर्जन मिरवणूक निघणार आहे तर 23 ऑक्टोबर रोजी 22 गावांमध्ये आणि 24 ऑक्टोबर रोजी 06 गावांमध्ये मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या विविध गावांमध्ये दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेखसह सहायक फौजदार, पोलीस हवालदार, राज्य राखीव पोलीस दलाचे पथक, होमगार्ड यांच्या वतीने चोख बंदोबस्त दिला जाणार आहे.






गावनिहाय विसर्जन मिरवणूक अशा
21 ऑक्टोबर रोजी आडगाव, बोरावल, बोराडे, पिळोदा खुर्द, कोळन्हावी तर 22 ऑक्टोबर रोजी यावल शहरासह चितोडा, परसाडे, नावरे, कोरपावली, चुंचाळे, नायगाव, टाकरखेडा, अंजाळे, बोरावल खुर्द, किनगाव खुर्द, किनगाव बुद्रुक, वड्री, सांगवी बुद्रुक, सातोद, पिंप्री, सावखेडासीम तसेच 23 ऑक्टोबर रोजी सातोद, चिपखेडा, कासारखेडा, मालोद, उंटावद, दोनगाव, महलखेडी, मनवेल, साकळी, डोंगरकठोरा, मोहराळे, कोळन्हावी, निमगाव, सांगवी खुर्द, वाघळुद, गिरडगाव, डांभुर्णी, अट्रावल, भालशिव, थोरगव्हाण, विरावली व आडगाव येथे मिरवणूक निघणार आहे.
24 ऑक्टोबर :- कोळवद, थोरगव्हाण, शिरसाड, अंजाळे, दहिगाव, सांगवी बुद्रुक.-पुर्ण-


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !