भुसावळात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : एका संशयीताला गुन्हे शाखेकडून अटक


भुसावळ (सोमवार, 19 ऑक्टोबर 2026) : पिस्टलासोबतचा फोटो पोलिसांना दाखवल्याच्या संशयातून शहरातील 17 वर्षीय तरुणीला चौघांनी धमकावत मारहाण केली तर एकाने तरुणीला जंगलात नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चौकडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अत्याचार करणार्‍या संशयीताला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. हसनेन शेख कुतूबुद्दीन (भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे नेमके प्रकरण?
शहरातील घोडेपीर बाबा परिसरातील मुस्लीम कॉलनी भागात 17 वर्षीय पीडीतेच्या घरात 17 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास संशयीत बाबा काल्या उर्फ आसीफ बेग असलम बेग, त्याचा मित्र मोहसीन उर्फ बाटूक, हसनैन व त्यांचा अनोळखी साथीदार पीडीतेच्या घरात शिरले. यावेळी संशयीताने आपला पिस्टलासोबतचा व्हिडिओ पोलिसांना का दाखवला ? म्हणत पीडीतेला बेल्टने मारहाण केली व पीडीतेला अंगावरील कपडे काढायला लावून त्याचा संशयीतांनी व्हिडिओ बनवत तो व्हायरलची धमकी दिली तर






जंगलात नेत अत्याचाराचा आरोप
संशयीतांपैकी एक मोहसीन उर्फ बाटूक याने पीडीतेला बाबा काल्यापासून वाचवतो म्हणून गोड बोलून दुचाकीवर बसवून जंगलात नेले व पीडीतेवर अत्याचार केला व आमचे नाव कुणालाही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी दिल्याचा आरोप पीडीतेने तक्रारीत केला आहे. पीडीतेच्या तक्रारीवरून आसीफ बेग असलम बेग उर्फ बाबा काल्या, शेख मोहसीन शेख सलीम उर्फ बाटूक, हसनेन शेख कुतूबुद्दीन व त्यांच्या सोबतच्या एका अनोळखीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
संशयीत आरोपी हसनेन शेख कुतूबुद्दीन (भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीद्वारे अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार गोपाल गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, अशोक बाविस्कर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !