भुसावळातील जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळात उत्साहात रंगला दांडियाचा कार्यक्रम

भुसावळ शहरात प्रथमच करणी मातेची घटस्थापना


भुसावळ (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : शहरातील जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित दांडिया महोत्सवात दांडियाने चांगलाच रंग भरला. यावर्षी मंडळाचे विशेष आकर्षण म्हणजे भुसावळ शहरात प्रथमच करणी मातेची घटस्थापना करण्यात आली होती. करणी मातेच्या दर्शनासाठी आणि घटस्थापनेच्या भक्तिमय सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या तरुणाईने आणि महिला वर्गाने देवीच्या जयघोषात तालावर ठेका धरत दांडिया महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.

आदिशक्तीच्या आरतीने सुरूवात
कार्यक्रमाची सुरुवात करणी माता आणि माता आदिशक्तीच्या मुख्य आरतीने व पूजनाने झाली. यानंतर दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.





मान्यवरांचा सहभाग व नियोजन
जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष दामोदर राजपूत, उपाध्यक्ष राकेश तळेले, सचिव पवन तेली यांच्यासह विरेंद्र राजपूत, आनंदा पाटील, प्रदीप पाटील, नितीन पाटील, गोपाल चौधरी, अतुल वायकोळे, हितेश भोळे, कनक पाटील, बालचंद कनोजिया, मुरली लोखंडे, संदीप राणा,बबन नावडे, वैभव भारंबे, संजय निळे, अक्षय कचवे, प्रवीण वळस्कर, विजय झोपे, दीपक पाटील, भूषण पाटील, भरत पाटील, गणेश पाटील आणि राजू माळी आदी पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिला वर्गाची विशेष उपस्थिती
दांडिया महोत्सवात महिलावर्गाचा उत्साह लक्षणीय होता. सारिका पाटील, राजश्री पाटील, रुपाली चौधरी, हर्षाली पाटील, दीपाली तेली, मीना राजपूत, जयश्री राजपूत, संगीता पाटील, अर्चना पाटील, श्रद्धा पाटील, अक्का पाटील, सविता पाटील, स्मिता पाटील, सुनीता कनोजिया, चैताली झोपे, रंजना पाटील, सोनाली बनसोडे, नीलिमा तळेले, मोहिनी वायकोळे, शीतल भोळे, शीतल कांडेलकर, वैशाली जाधव,रीता निळे, योगिता भारंबे, आशा नावडे, शोभा लोखंडे आणि संगीता अटवाल यांच्यासह शेकडो महिला भगिनींनी दांडिया खेळत महोत्सवाच्या रंगतीत भर घातली. करणी मातेची भुसावळात प्रथमच झालेली घटस्थापना आणि संगीताच्या तालावर रंगलेला हा दांडिया सोहळा संपूर्ण भुसावळकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !