यावल शहरातील डॉ.जाकिर हुसेन उर्दू हायस्कूलच्या उत्कृष्ट शिक्षकांसह विद्यार्थी खेळाडूंचा गौरव
यावल (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : यावल शहरातील नॅशलन एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.जाकिर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे तालुका, जिल्हा आणि विभाग पातळीवर विविध खेळ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्था , मुख्याध्यापक आणि सर्क शिक्षक व शिक्षकेतर वर्गाकडून विद्यार्थ्यांचा कौतुक आणि सन्मान करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनाही गौरविण्यात आले.
यांचा झाला गौरव
त्यात अर्षद खान हमीद खान (बेस्ट टीचर) अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना यांच्या वतीने तसेच गुलाम गौस खान अजीज खान (बेस्ट टीचर) एस.बी.आय.यावल ब्रांचतर्फे पुरस्कार मिळालेल्या व तुफेल अहमद अब्दुल हक (प्राचार्य) यांना विविध संस्थांकडून स्टार अवार्ड कोलाब्रोशन विद टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेतर्फे शिक्षक आणि प्राचार्य यांच्या सत्कार करण्यात आला.




यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान होते. संस्था सचिव जफरउल्ला खान अमानउल्ला खान, संस्था उपाध्यक्ष मोहम्मद याकुब शेख यासीन, युनिक आयटीआय चेअरमन अताउल्ला खान सैफउल्ला खान, उपसचिव युसूफ खान ताहेर खान उपस्थित होते. अन्सारुद्दीन अनवरुद्दीन यांनी सूत्रसंचालन केले. सर्व संस्था चालकानी सर्वांचे अभिनंदन केले.
