भुसावळात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : संशयीताला पकडले
भुसावळ (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : रेल्वेच्या रिझर्व्ह तिकीटांची ब्लॅकमध्ये विक्री करणार्या इसराइल खान इस्माइल खान (रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यास रेल्वे सुरक्षा बलाने दोन रेल्वे तिकिटांसह ताब्यात घेतले. प्रत्येक तिकिटामागे 100 रुपये कमिशन घेऊन संशयीत दलाली करीत असल्याचे स्पष्ट झाले.
एका संशयीताला अटक
आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक एस.जे.दुबे यांनी हवालदार राकेश पाटील यांच्या तक्रारीवरून 19 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 11.05 वाजता भुसावळ रेल्वेस्थानकाच्या उत्तर बाजूच्या आरक्षण केंद्रात तपासणी केल्यानंतर संशयीताला ताब्यात घेण्यात आले. संशयीताकडून 18 डिसेंबर 2026 रोजी भुसावळहून जबलपूरकडे जाणार्या गाडी क्रमांक 22177 चे 750 रुपये किंमतीचे तिकीट तसेच 20 ऑक्टोबर रोजी भुसावळहून नवी दिल्लीकडे जाणार्या गाडी क्रमांक 12715 चे 1 हजार 480 रुपये किंमतीचे तिकीट जप्त करण्यात आले. तपास सहाय्यक उपनिरीक्षक महीलाल सिंह करीत आहेत.




