जळगाव-पानिपतदरम्यान मध्य रेल्वेची विशेष गाडी ; उद्या पहिली फेरी

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी निर्णय ; भुसावळसह आठ स्थानकांवर थांबे


जळगाव (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने जळगाव ते पानिपतदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगाव, भुसावळसह मार्गावरील विविध स्थानकांवरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ही विशेष गाडी बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी जळगावहून रवाना होईल. परतीचा प्रवास 22 ऑक्टोबर रोजी पानिपत येथून सुरू होईल.

जळगावहून बुधवारी सायंकाळी प्रस्थान
विशेष गाडी 01067 बुधवार, 21 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी, गुरुवारी दुपारी चार वाजता पानिपत येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01068 ही गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026 रोजी पानिपत येथून सायंकाळी सात वाजता सुटेल.





ही गाडी दुसर्‍या दिवशी, शुक्रवारी दुपारी 4.40 वाजता जळगाव येथे पोहोचणार आहे. या विशेष रेल्वेगाडीला भुसावळ, खंडवा, भोपाळ, बिना, आग्रा कॅन्ट, पलवल आणि नवी दिल्ली या स्थानकांसह पानिपत येथे थांबा देण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !