भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विजयादशमीनिमित्त ‘रामायण’ नाटीका
भुसावळ (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : भुसावळ शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विजयादशमी (दसरा) निमित्त सोमवारी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘रामायण’ महाकाव्यावर आधारित अत्यंत मनमोहक आणि प्रेरणादायी नाटिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमाला मुख्यत्वे शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर, व्हाइस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले आणि मनप्रीत कौर उपस्थित होत्या. या विशेष नाटिकेचे यशस्वी आयोजन शिक्षिका प्रतिभा काकडे आणि जयश्री मोरेस्कर यांनी केले.
विद्यार्थ्यांनी दाखवली अभिनयाची चुणूक
या नाटीकेत शाळेच्या इयत्ता दहावीच्या छात्र-छात्रांनी विविध पौराणिक पात्रांच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांचा जिवंत अभिनय आणि संवादफेकीने उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली.




प्रिंसिपल यांनी दिली रामायणाची शिकवण
या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रिंसिपल नीना कटलर यांनी रामायणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रभू श्रीरामांचे आदर्श, मर्यादा आणि जीवनमूल्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. रामायण आपल्याला सत्य, धर्म आणि मोठ्यांचा आदर करण्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण देते असे त्या म्हणाल्या.
उत्साहात झाले रावणदहन
कार्यक्रमाच्या सांगते प्रसंगी शाळा परिसरात पारंपरिक पद्धतीने रावणदहनाचा कार्यक्रम पार पडला. नाटीकेत श्रीरामाची मुख्य भूमिका साकारणार्या विद्यार्थ्याने संयुक्तपणे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. या दरम्यान संपूर्ण परिसर ‘जय श्री राम’ च्या जयघोषाने गुंजून उठला. या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहमी वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचाच विजय होतो, हा संदेश देण्यात आला.
