पातोंडी सरपंच नम्रता कोळी जातप्रमाणपत्राअभावी पायउतार
रावेर (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : पातोंडी लोकनियुक्त सरपंच नम्रता समाधान कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने अपर जिल्हाधिकारी जळगाव यांनी अपात्र केले आहे यामुळे तालुक्यात एकच राजकीय खळबळ उडाली आहे.
असे अपात्रता प्रकरण
पातोंडी तालुका रावेर येथे 2003 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती येथील लोकनियुक्त सरपंच पदाची जागा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होती या जागेवरून नम्रता समाधान कोळी यांनी निवडणूक लढवली होती यात ते विजयी झाल्या परंतु एक वर्षानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे त्यांचे अनुसूचित जाती जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पातोंडी येथील माजी सरपंच मोहन दशरथ बोरसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हरकत घेतली होती व याची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती.




तक्रारीची वेळोवेळी सुनावणी झाली यात सरपंच नम्रता समाधान कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही म्हणून अप्पर जिल्हा अधिकारी जळगाव डॉक्टर श्रीमंत हारकर यांनी आज त्यांच्यावर अपात्रीची कारवाई केली आहे या बाबत सरपंच नम्रता समाधान कोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जिल्हाधिकारी महोदय यांची कारवाई झाल्याचे समजले आदेश आल्यावर प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले.
