असत्यावर मात केल्याने सत्याचा विजय : आमदार नंदकिशोर महाजन


यावल (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून देशाचे भविष्य व आपली संस्कृती टिकवण्यासाठी देव आणि धर्म टिकवावा अखंड भारतामध्ये परकीय शक्ती तरुणांना हाताशी धरून विद्रोह माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच्यावर जर आपल्याला विजय मिळवायची असेल सर्वांनी एक संघ राहण्याची गरज आहे. अशा चांगल्या उत्सवातून बोध घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आणि असत्यावर मात करून सत्याचा विजय कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे मत यावल येथे आयोजित श्री महर्षी व्यास मंदिराच्या परिसरात रावण दहन कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात विधान परिषद आमदार नंदू महाजन यांनी यावेळी आवाहन केले.

भारतीय संस्कृती खूप महान संस्कृती
छत्रपती शिवाजी महाराज मंडळाची रावण दहनाची वर्षानुवर्षीची परंपरा सुरू असून त्याचे त्यांनी मनापासून कौतुक करून भारतीय संस्कृती खूप महान संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये अनेक सण व उत्सव आपण साजरे करतो त्यामागे खूप मोठा हेतू असतो. प्रत्येक उत्सव आपल्याला एक जीवनाशी वेगळी दिशा देणारा उत्सव असतो, विजयादशमी हा उत्सव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दसरा मानला जातो.






वाईट वृत्तीमुळे रावणाचे दहन
नगराध्यक्षा छाया अतुल पाटील म्हणाल्या की, अहंकार रुपी रावणाचा रामाने गर्वहरण केले. काही वाईट प्रवृत्तीच्या विचारामुळे त्याचा विनाश झाला त्याचप्रमाणे शहरातही अनेक रावण आहेत त्यांनी आपली अहंकार सोडून सर्वांचे हित कसे लक्षात घेता येईल याकडे पाहिलं पाहिजे. शहरात सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही यासाठी 56 कोटी योजनेची 50 टक्के काम शेळगाव बॅरेज वरून पूर्ण झाले आहे त्यासाठी शासनाकडून 10 कोटी रुपये मिळणार होते. दोन दिवस आधी आम्ही यादीमध्ये ठेकेदाराचे नाव आम्ही प्रत्यक्ष पाहिले होते. जळगाव जिल्ह्यातील इतर नगरपालिकांचे पैसे मिळाले मात्र यावलचे नाव ऐनवेळी कट करण्यात आले यात पाण्यात राजकारण करणार्‍या पडद्याआडील लोकांनी राजकारण करू नये व शहराच्या विकासासाठी आडमुठे धोरण स्वीकारू नये, असेही ते म्हणाले.

26 वर्षांची परंपरा
डॉ.कुंदन फेगडे यांनी छत्रपती शिवाजी मंडळाने रावण दहनाचा कार्यक्रम गेल्या 26 वर्षापासून त्यात दोन वर्ष कोरोनाची वगळता सुरू ठेवला आहे व अशा कार्यक्रमांची शहरात गरज असते असे सांगून या कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे कौतुक केले व उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली

वाईट प्रवृत्तीमुळे रावणाचा अंत
केवळ अहंकार दुराचार आणि वाईट प्रवृत्तीच्या विचारामुळे रावणाचा अंत झाला. त्याच्या भावानेच असत्याची साथ सोडली व सत्यतेसाठी विभीषण रामासोबत धावून गेला त्यामुळेच रावणाच्या पराभव झाला. असत्याची साथ देणार्‍यांना जनता ही माफ करत नाही, असा मार्मिक टोला माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी लगावला.

यांची होती उपस्थिती
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन साने गुरुजी हायस्कूलचे शिक्षक विजय ननवरे यांनी केले. आमदार नंदकुमार महाजन यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावर जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी नगराध्यक्ष दीपक बेहडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंह राजपूत, शिवसेनेचे नगरसेवक सागर चौधरी, भाजपा गटनेत्या नंदा महाजन, नगरसेवक हेमराज उर्फ बाळूभाऊ फेगडे, योगेश चौधरी, कदीर खान, रुबाब तडवी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अकिल शेठ बोदळे नाना, शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, स्वप्नील कोळंबे, विजय सराफ आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळरचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले व त्यांच्या संपूर्ण टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रावणाच्या पुतळ्याचे दहन आमदार नंदू महाजन व नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांच्याहस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. अमोल भिरुड यांनी आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !