हुतात्मा एक्स्प्रेसला आता एलएचबी कोचेस

भुसावळ : पुणे-भुसावल हुतात्मा एक्स्प्रेसला आता एलएचबी कोचेस लावण्यात आले असून मंगळवार, 27 ऑगस्टपासून ही गाडी नव्या रंगात प्रवाशांना दिसणार आहे. गत आठवड्यात याबाबतची चाचणी घेण्यात आली. जर्मन टेक्नोलॉजीने निर्मित केलेले एलएचबी डब्बे या गाडीला जोडण्यात आल्याने आधीपेक्षा आता प्रवाशांचा सुखद प्रवास होणार आहे. दोन ब्रेक, लगेज कम जनरेटर कार, एक जनरल, 14 चेयर कार एक 1एसी चेयर कार तसेच एक स्लीपर असे एकूण 19 कोचेस घेवून हुतात्मा धावणार असून गाडीच्या प्रत्येक डब्ब्यात एलईडी लाईटिंग लावण्यात आली आहे शिवाय बे्रक सिस्टिमही अद्यावत असून डिस्क ब्रेक कोचेसला असणार आहे.
