साकळी गावातील दोन मुलींना सर्पदंश : यावलला प्रथमोपचार करून जळगाव हलवले


यावल (गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील साकळी या गावातील इंदिरानगर भागातील रहिवासी दोन मुलींना बुधवारी शेतशिवारात कडबा कापणी, वेचणी व बांधणीचे काम करीत होत्या. शेतात काम करत असतांना दोघा मुलींना एका विषारी सापाने दंश केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारास करीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. दोन्हीपैकी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्यचे सांगण्यात आले.

शेतात झाला सर्पदंश
साकळी, ता.यावल या गावातील इंदिरानगर भागातील रहिवासी शिरीन शकील शेख (17) व मुस्कान सलीम तडवी (18) या मुली साकळी गावालगत असलेल्या अमोल मोते यांच्या शेतात कडबा कापणी, वेचनी आणि बांधणीचे काम करीत होत्या. काम करत असतांना या दोघा मुलींना एकाच सापाने दंश केला. सर्प हा विषारी होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने त्यांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रतीक राजपूत, डॉ.शहादाब शेख, अधिपरिचारीका पूजा मेढे, सरला वडार अधिपरिचारक जॉन्सन चोरटे, बापू महाजन, भूषण गाजरे आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले मात्र यातील मुस्कान तडवी हिची प्रकृती गंभीर असल्याने व सर्प हा विषारी असल्याने या दोघींना तातडीने पुढील उपचाराकरीतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !