हरीपुरा-जामुनझिरा रस्त्यावर बिबट्याचा वावर ! शेतकर्यांमध्ये भीती
यावल (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील हरिपुरा येथून जामुनझिरा जाणार्या रस्त्यावर असलेल्या एकोरा नाल्यामध्ये दुचाकीवर दोघे जात असताना त्यांना अचानक बिबट्याचे दर्शन घडले. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बिबट्या त्यांच्या समोरून गेला. अचानक झालेल्या बिबट्याच्या दर्शनामुळे हरिपुरा वर्षातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकर्यांमध्ये पसरली भीती
हरीपुरा येथून सातपुड्याच्या कुशीतील जामुनझिरा जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर एकोरा नाल्याजवळ गुरुवारी सायंकाळी अॅड.नितीन कोळी (हरीपुरा) व दशरथ भिलाला (रा.पांढरी वस्ती) हे दोघेजण दुचाकी द्वारे जामुनझिरा येथे जात असताना अचानक त्यांच्यासमोरून बिबट्या गेला. अचानक बिबट्याचे दर्शन घडल्यामुळे दोघेजण हे प्रचंड घाबरले व याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. रात्री शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जाणार्या शेतकर्यांनी दक्षता घ्यावी अशी आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अचानक बिबट्याचे दर्शन घडल्याने शेतकरी आणि शेतमजूर वर्गामध्ये भीती पसरली आहे. वनविभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील होत आहे.